ऐतिहासिक माहिती

इतिहास आणि बदल

प्राचीन/मध्ययुगीन उल्लेख कमी असून, नरवाड हा परिसर परंपरागतरीत्या शेतीवर अवलंबून होता. आसपासच्या भागात ऐतिहासिकदृष्ट्या मराठा-काळापासून नागरी व ग्रामस्थ जीवनाचा रुज दिसतो.

ग्रामपंचायत — संचलन, जबाबदाऱ्या आणि स्थानिक प्रशासन

स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत कामांमधून त्यांचा कारकीर्द सुरू झाली.

लोकसंख्या, समाजरचना व सांगाडा आकडे

नरवाड ला स्वतःची ग्रामपंचायत आहे. स्थानिक विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, शाळा व इतर सुविधा ग्रामपंचायतीतून नियोजित व अंमलात आणल्या जातात. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या सर्व योजना गावांमध्ये राबविलेले आहेत नरवाड गावामध्ये चार वाड्यावस्ती आहेत त्या सर्व वाड्यावस्त्या नैसर्गिकरित्या नटलेल्या आहेत व त्यामध्ये ग्रामपंचायत नरवाड यांच्यावतीने सर्व सेवा सुविधा पुरविल्या जातात या वाड्यावसत्या नरवाड गावापासून प्रत्येकी दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहेत व ती सर्व पक्क्या रस्त्याने जोडलेले आहेत तसेच सर्व वाड्या वस्तीवर प्राथमिक शाळा अंगणवाडी सुसज्ज आहेत सर्व वाड्यावसत्यावरून जाणे येण्यासाठी बस सुविधा आहेत नरवाड गावातील लोक हे जास्त प्रमाणात मळा भागात आपल्या शेतात राहतात नरवाड मध्ये म्हैसाळ ताकारीचे योजना आहे नरवाड मध्ये नागवेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण शेती आहे येथून मुंबई श्रीरामपूर नाशिक चांदवड कोकण या भागात हे पान निर्यात केली जाते यावर या गावातील कामगारांचे शेतकऱ्यांचे प्रमुख उदरनिर्वाहाचे साधन आहे

शिक्षण आणि संस्था

2011 च्या जनगणनेनुसार, नरवाड ची लोकसंख्या 7,353, घरांची संख्या 1,449 आहे. लिंग गुणोत्तर, बालसंख्या व समाजवर्ग यांचे तपशील उपलब्ध आहेत. नरवाड गावामध्ये एकूण पाच जिल्हा परिषद शाळा आहेत एक दि हिंद एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल एक संस्था आहे आठ अंगणवाडी आहेत नरवाड गावांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेता येते विकास सोसायटी ही संस्था गावांच्या शेतकऱ्यांसाठी मूलभूत रूपात काम करते तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक व आयसीआयसीआय या दोन बँका गावामध्ये कार्यरत आहेत दोन सहकारी पतसंस्था आहेत नरवाड गावातील शालेय विद्यार्थी विविध स्पर्धेमध्ये यश प्राप्त करतात येथील विद्यार्थी विविध क्षेत्रात तालुकास्तर जिल्हास्तर यामध्ये आपल्या गावाचे नाव लौकिक करतात

आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संपर्क

गावात प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत; स्थानिक सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी आमचे गाव परिपूर्ण आहे प्रत्येक शाळेमध्ये विविध खेळ शिकवल्या जातात त्यामध्ये कबड्डी खो-खो पळण्याच्या शर्यती फुटबॉल हॉलीबॉल क्रिकेट कुस्ती इत्यादी. नरवाड गावामध्ये आरोग्य उपकेंद्र आहे ते सर्व सोयोनियुक्त असे आहे यामध्ये सर्व गावकऱ्यांचे आरोग्य तपासणी वेळेवर केली जाते लहान मुलांना वेळेत डोस दिले जातात गरोदर मातांच्या साठी सर्व उपाययोजना केल्या जातात या उपकेंद्रामध्ये ग्रामपंचायत नरवाड कडून औषधे पुरविले जातात किशोरवयीन मुलींची तपासणी करून त्यांना हिमोग्लोबिन ची सर्व औषध दिले जातात

धार्मिक-सांस्कृतिक जीवन आणि उत्सव

नरवाड गावामध्ये सर्व धर्मीयांचे लोक राहतात यामध्ये हिंदू मुस्लिम यांचे सण सर्वांनी मिळून साजरे करतात उदाहरणार्थ मोहरम यामध्ये गावातील सर्व जातीचे लोक वेगळ्या पद्धतीने साजरे करतात यावेळी शेजारील असलेल्या म्हैसाळ गावातील पीर देव नरवाड गावातील देवांना भेटीसाठी येतात त्यावेळी करबल खेळले जाते गावातील सर्व लोकांना सरबत खजूर वाटले जातात गावातील सर्व लोक एकत्र येऊन त्या देवावरती अबीर या पदार्थाचा उधळण करतात तसेच धनगर समाजातील लोक वर्षातून दोन वेळा मोठी यात्रा साजरी करतात त्यावेळी संपूर्ण गाव प्रसाद घेण्यासाठी एकत्र जमा होते या गावांमध्ये नंदीवाले समाज हा एक घटक आहे तो घटक रोजंदारी करतो व त्यांचे सणवार अतिशय मोठ्या उत्साहाने साजरे करतो गावातील सर्व लोकांना त्याचे आमंत्रित देतो सर्व समाजातील लोक त्यांच्या घरी जाऊन आनंदाने जेवण करतात तसेच नरवाड गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवी ही आहे त्याची यात्रा चैत्र महिन्यामध्ये होते ज्योतिबा डोंगरावर यात्रा झाल्यानंतर तेथील आसन काठी गावामध्ये येते नंतर या यात्रेचा मुहूर्त धरला जातो सर्व जातीतील लोक या यात्रेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये सहभागी होतात तसेच नरवाड गावातील वारकरी लोक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पाई दिंडीला जातात नरवाड गावामध्ये भजनी मंडळ आहेत हे भजनी मंडळे विविध स्पर्धेमध्ये भाग घेतात व त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकीवतात तसेच नरवाड गावामध्ये जुनी सांस्कृतिक परंपरा जोपासली जाते त्यामध्ये भारुड सोंगी भजन पोवाडा इत्यादी संघ आहेत तसेच सर्व शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन होते त्यामध्ये विविध क्षेत्रातील वाद्य गाणी यांचा समावेश होऊन गावासमोर त्यांचे कला दाखवली जाते गावामध्ये धनगर समाजातील लोक ढोल वादन करतात गावांमध्ये विविध समुदायाचे संप्रदाय आहेत त्याद्वारे लोकांना एकत्र करून एक भक्तीरुपी ज्ञान दिले जाते नरवाड गावामध्ये दसऱ्या दिवशी एका सरकार घराण्यातून वाजत गाजत जाऊन आपटा लुटला जातो आणि तेथून एकमेकांना आपट्याची पाने वाटली जातात